Vidyarthi Gunvatta Vikas Abhiyan 2024: होय... शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी गुणवत्ता विकास महाअभियान राबवण्यात येणार आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अमलबजावणी मध्ये येणारे अडथळे आणि बदल बाबत राबविल्या जाणाऱ्या या Vidyarthi Gunvatta Vikas Abhiyan 2024 चा कालावधी, रूपरेषा आणि संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.
Vidyarthi Gunvatta Vikas Abhiyan 2024 |
राज्यामध्ये गूणवत्ता विकाससाठी महाअभियान; अधिकारी येणार शाळेवर | Vidyarthi Gunvatta Vikas Abhiyan 2024
मा. मंत्री, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 26 जुलै 2024 रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट-2024 मध्ये "विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान" राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान कालावधी
योजनांची प्रभावी अंमलबजावणी व विद्यार्थी विकासाच्या अनुषंगाने विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान दिनांक 01 ते 31 ऑगस्ट 2024 या दरम्यान राबविला जाणार आहे.
विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान उद्देश
- सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय हे पाहणे,
- अंमलबजावणीमध्ये येणा-या अडथळे पाहणे,
- आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करणे
विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानाची कार्यदिशा
- अभियानादरम्यान पहिल्या 20 दिवसात प्रत्यक्ष शाळाभेटी करणे,
- तद्नंतरच्या 06 दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा / उपायोजना करणे,
- तदनंतरच्या 04 दिवसामध्ये अनुपालनाची खात्री करणे.
अधिकारी येणार शाळेवर
- आठवडयातील प्रत्येक सोमवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यलयीन कामकाज करणे
- उर्वरित तीन/चार दिवस शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी शाळा भेटी करणे..
सरलवरून शाळाभेटींच्या नोंदी
- सरल पोर्टलवर केंद्रप्रमुख /गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी/प्राचार्य/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी/निरीक्षण अहवाल लॉगीन मधून दररोज अद्यावत करावे.
- उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जातील अशा प्रकारचे उद्दीष्ट ठरवुन द्यावे.
गूणवत्ता विकाससाठी महाअभियान भाग - दोन :
- अभियानातील दूसरा भाग म्हणजे "लोकसेवा हमी कायद्यांतर्गत" येणाऱ्या 250 सेवा लाभार्थ्यांना विहीत वेळेत मिळाव्यात असे अपेक्षीत आहे.
- अभियान दरम्यान कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात याव्यात.
- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण), मा. प्रधान सचिव (शालेय शिक्षण) व आयुक्त (शालेय शिक्षण) क्षेत्रीय स्तरावर विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. वरील दोन्ही बाबींची फलनिष्पत्ती तपासणार असल्यामुळे आधिक प्रभावी राबविण्यात येणार
खालील मुद्यांची होणार पाहणी Vidyarthi Gunvatta Vikas Abhiyan 2024
- शैक्षणिक गुणवत्ता PAT, PGI, NAS, ASER, जिल्हा स्वास्थ्य पत्रिका नूसार करण्यात आलेल्या उपाययोजना
- इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती (इयत्ता 1ते 12 वी)
- गणवेश सन 2024-25 उपलब्धता
- प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतंर्गत भोजन उपलब्धता / दर्जा / परसबाग विकास स्थिती/ स्वयंपाकगृह उपलब्धता, इ.
- स्काउट गाईड प्रशिक्षण तासाचे आयोजन
- विविध संस्थानी शासनासोबत केलेल्या कराराबाबत अमलबजावणी स्थिती
- वर्ग खोल्यांची स्थिती
- स्वच्छतागृह उपलब्धता
- स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अमलबजावणी
- अध्ययन-अध्यापन साहित्याची उपलब्धता/ई- अध्ययन
- शाळांमध्ये इंटरनेट सुविधा
- दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती
- पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानाचा प्रभावी उपयोग
- विद्यार्थी उपस्थिती व आधार नोंदणी
- आनंददायी शनिवार अमलबजावणी
- शाळांची वेळ ठरविण्या बाबतची स्थिती