Javahar Navodaya Vidyalaya Admission: नवोदय विद्यालय समितीकडून जवाहर नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता सहावीच्या प्रवेशाची सूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी निवड चाचणीद्वारे Javahar Navodaya Vidyalaya सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेल्या navodaya.gov.in लिंक वरून पात्र विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. संपूर्ण माहिती खालील प्रमाणे
navodaya.gov.in |
जवाहर नवोदय विद्यालय चाचणी २०२५ ऑनलाईन नोंदणी सुरु; इथे करा नोदणी @navodaya.gov.in
JNV Admission 2025 class 6th @navodaya.gov.in
तपशील कालावधी परीक्षा नाव
JNV निवड चाचणी 2025
प्रवेश
इयत्ता सहावी
ऑनलाईन फॉर्म शेवट
दि 23 सप्टेंबर 2024
परीक्षा दिनांक
18 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट
https://navodaya.gov.in/
रजिस्ट्रेशन लिंक
परीक्षा नाव
JNV निवड चाचणी 2025
प्रवेश
इयत्ता सहावी
ऑनलाईन फॉर्म शेवट
दि 23 सप्टेंबर 2024
परीक्षा दिनांक
18 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट
https://navodaya.gov.in/
रजिस्ट्रेशन लिंक
JNV माहितीपुस्तिका
JNV फॉर्म भरा
JNV Apply Now
असा भरा फॉर्म JNV Registration Process
- मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र
- छायाचित्र
- पालकांची स्वाक्षरी
- उमेदवाराची स्वाक्षरी
- आधार तपशील/ सक्षम सरकारने जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र
- उमेदवाराचे मूलभूत तपशील जसे की राज्य, जिल्हा, ब्लॉक, आधार क्रमांक इ अर्ज पोर्टलवर भरावे.
Navodaya Vidyalaya Samiti Vision
प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाची सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता दर्जेदार आधुनिक शिक्षण देणे, सामाजिक मूल्ये, पर्यावरण जागरूकता, साहसी उपक्रम आणि शारीरिक शिक्षण यासारखे महत्त्वाचे घटक विकसित करण्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन Navodaya Vidyalaya Samiti कार्य करत आहे.
- सदर परीक्षा लेखी वस्तुनिष्ठ स्वरुपात CBSE कडून घेतली जाते. यामागील मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील प्रतिभावान व हुशार विद्यार्थी कोणत्याही अडचणी शिवाय परीक्षेत सहभागी होऊ शकतील. Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi
- ही परीक्षा दरवर्षी ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्या जिल्ह्यात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
- महाराष्ट्र राज्यात 34 जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहेत.
- जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दरवर्षी सहावी, नववी आणि अकरावी वर्गासाठी प्रवेश दिला जातो.
इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी अटी व पात्रता निकष
- ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहेत त्याच जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतील. तथापि ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे परंतु नंतरच्या काळामध्ये त्या जिल्ह्याचे विभाजन झाले असल्यास मूळ जिल्ह्याच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.
- विभाजनाची ही अट विभाजित करण्यात आलेल्या नवीन जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु झाले नसेल.
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीमध्ये शासकीय / शासकीय अनुदानित अथवा अन्य मान्यता प्राप्त शाळा / विद्यालयात प्रवेशित असणे अनिवार्य आहे किंवा समग्र शिक्षा योजने अंतर्गत चालू असलेल्या शाळा किंवा राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था (NIOS) मधील ब प्रमाणपत्र योजनेतील अभ्यासक्रमात किमान गुण (अध्ययन स्तर) प्राप्त करणे आवश्यक आहे.
- एखाद्या शाळा / विद्यालयास मान्यता प्राप्त शाळा म्हणून तेव्हाच समजले जाईल जेव्हा त्या शाळा / विद्यालयास शासन किंवा शासनमान्य अधिकृत संस्थेद्वारा मान्यता देण्यात आली असेल.
- समग्र शिक्षा अंतर्गत चालणाऱ्या शाळा / विद्यालयास शासन किंवा शासनमान्य अधिकृत संस्थेद्वारा मान्यता असणे अनिवार्य आहे. अशी एखादी शाळा जिथे विद्यार्थ्याने राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था अंतर्गत प्रमाणपत्र ब प्राप्त केला असेल ती शाळा किंवा विद्यालय राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था द्वारा प्रामाणित असली पाहिजे.
- विद्यार्थी हा प्रवेश पूर्व इयत्ता पाचवीची परीक्षा उतीर्ण केलेला असावा. कारण त्यास केवळ वरील अटींवर इयत्ता सहावीमध्ये प्रवेश दिला जातो.
- जो विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छीत आहे त्याचे वय 9 ते 13 वर्षामधील असणे आवश्यक आहे. ही वयाची अट प्रत्येक संवर्गासाठी लागू आहे. ज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचाही समावेश होतो.
- एखादा विद्यार्थी ज्याने एक दिवस ही शहरी भागातील असणाऱ्या शाळेत इयत्ता तिसरी चौथी किंवा पाचवी इयत्तेत शिकला असेल तो विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थी गणला जाईल. "जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती | Navoday Vidhyalaya Admission Information In Marathi"
- शहरी क्षेत्र याचा अर्थ कि जो 2011 च्या जणगणने नुसार किंवा त्यानंतर शासनाने शहरी क्षेत्र म्हणून सूचित केलेले आहेत. त्या शिवाय इतर सर्व क्षेत्र ग्रामीण क्षेत्र म्हणून ओळखले जातील.
- ग्रामीण कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने मागील तीन वर्षामध्ये सलग तीन सत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था / शासकीय अनुदान प्राप्त / मान्यता प्राप्त शाळेमधून इयत्ता तिसरी चौथी किंवा पाचवी ची परीक्षा उतीर्ण झाला असावा. आणि प्रती वर्ष एक पूर्ण शैक्षणिक सत्र ग्रामीण भागात पूर्ण केलेला असावा.
- ते विद्यार्थी आवेदन करण्यास पात्र नाहीत ज्यांना 30 सप्टेंबर च्या पूर्वी पुढील वर्गात प्रमोट केला गेला नसेल आणि इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश दिला नसेल.
- कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणी परीक्षेत बसण्यास दुसऱ्यांदा प्रात्र होणार नाही. एकदाच परीक्षेस बसू शकेल.
- प्रत्येक जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या जागेपैकी 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात तर उर्वरित जागा ह्या शहरी भागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यासाठी जागेचे आरक्षण "Javahar Navoday Vidhyalaya Admission" हे त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षित ठेवले जातात. परंतु कोणत्याही लोकसंखेमध्ये राष्ट्रीय प्रमाणापेक्षा (15 टक्के अनुसूचित जाती आणि 7.5 टक्के अनुसूचित जमाती) कमी अथवा 50 टक्केपेक्षा अधिक असू नये. हे आरक्षण अंतर परिवर्तनीय आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी निवडले गेलेल्या विद्यार्थ्यासाठी अतिरीक्तपणे लागू केले जाते.
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांच्या आरक्षणाव्यतिरिक्त 27 टक्के आरक्षण इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी दिले जाते. इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण केंद्रीय सूची वेळोवेळी जाहीर केलेय नुसार लागू केले जाते. ज्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय सूचीमध्ये समावेशित केले गेले नाही ते विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून आवेदन करू शकतील.
- एकूण जागेच्या एक तृतीयाश जागा मुलीमधून भरल्या जातात.
- दिव्यांग विद्यार्थ्यासाठी (अस्थीव्यंग, कर्णबधीर, दृष्टीबाधित अंध) केंद्र शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची तरतूद आहे.
- दृष्टीबाधित अंध विद्यार्थ्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका अट पूर्ण होत असेल तरच मान्य होईल.
- पूर्णतः अंध असावा किवा दृष्टी तीव्रता 6/60 किंवा 20/200 पेक्षा अधिक असू नये किंवा दृष्टी क्षेत्राचा कोन 20 अंश किंवा त्यापेक्षा कमीअसावे.
- कर्णबधिरत्व किंवा श्रवण दिव्यांगता ज्या विद्यार्थ्याचा श्रवणऱ्हास 60 dB पेक्षा अधिक असावा
- हलनचलन दिव्यांगता अस्थी,सांध्यामधील व स्नायुमधील दोषामुळे हात पाय च्या संचालन / हालचाल करताना कायमस्वरूपी अडथळा येत असेल अथवा हालचालीवर नियंत्रण राहत नसेल,
- दिव्यांग व्यक्तीचा थोडक्यात असा अर्थ आहे कि शरीरातील कोणत्याही प्रकारची दिव्यांगता किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असेल आणि शल्य चीक्त्साकाक्डून प्रमाणित केलेलं प्रमाणपत्र असेल.
परीक्षा व माध्यम
- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVTE) ही वेगवेगळ्या 20 अधीसुचीत केलेल्या भाषेपैकी कोणत्याही एक भाषा निवडता येईल. अधिसूचित करण्यात आलेल्या भाषा आसामी, बंगाली, बोडो, इंग्रजी, गारो, गुजराती, हिंदी, कन्नड, खासी, मल्याळम, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, मणिपुरी, मणिपुरी (बांगला लिपी), तामिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश होतो.
- बुद्धिमत्ता या विषयासाठी 60 मिनिटे वेळ असून एकूण गुणांपैकी 50 टक्के गुण यासाठी दिले जातात तर अंकगणित आणि भाषा विषयासाठी 60 मिनिटे वेळ आणि उर्वरित 50 टक्के गुण समान विभागून दिले जाते
List of Jawahar Navodaya in Maharashtra
Sr No | School Name |
1 | JNV AHMEDNAGAR |
2 | JNV AKOLA |
3 | JNV AMRAVATI |
4 | JNV AURANGABAD |
5 | JNV BEED |
6 | JNV BHANDARA |
7 | JNV BULDHANA |
8 | JNV CHANDRAPUR |
9 | JNV DHULE |
10 | JNV GADCHIROLI |
11 | JNV GONDIA |
12 | JNV HINGOLI |
13 | JNV JALGAON |
14 | JNV JALNA |
15 | JNV KOLHAPUR |
16 | JNV LATUR |
17 | JNV NAGPUR |
18 | JNV NANDED |
19 | JNV NANDURBAR I |
20 | JNV NANDURBAR II |
21 | JNV NASHIK |
22 | JNV OSMANABAD |
23 | JNV PALGHAR |
24 | JNV PARBHANI |
25 | JNV PUNE |
26 | JNV RAIGAD |
27 | JNV RATNAGIRI |
28 | JNV SANGLI |
29 | JNV SATARA |
30 | JNV SINDHUDURG |
31 | JNV SOLAPUR |
32 | JNV WARDHA |
33 | JNV WASHIM |
34 | JNV YAVATMAL |