CM - Mazi Ladki Bahin Yojana 2024: राज्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरु; असा करा अर्ज

 CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024: दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात सादर झालेल्या राजाच्या अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिलांसाठी खास योजनां जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये खालील पात्र महिलाना दरमहा बँक खात्यात रक्कम दिली जाणार आहे.  योजनेचे नाव "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना असून सविस्तर माहिती खाली दिली आहे.

Mazi Ladki Bahin Yojana 2024
Mazi Ladki Bahin Yojana 2024

CM - Mazi Ladki Bahin Yojana 2024: राज्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरु; असा करा अर्ज 

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग वतीने दिनांक 28 जून, 2024 रोजी CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024 बाबत शासन निर्णय (GR) पारित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ऍनिमियाचे प्रमाणे जास्त आहे.  ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.शा त्यासाठी सन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यानुसार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोपणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री- माझी लाडकी वहीण" योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024 योजनेचा उद्देश

राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.त्यां

महिला व मुलींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. 

राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.

राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.

महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोपण स्थितीत सुधारणा करणे 

CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024 योजनेचे स्वरुप 

पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट बँक खात्यात दरमहा रु.1500/- इतकी रक्कम दिली जाणार आहे. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या इतर आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.1500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.

CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024 कुणासाठी आहे?

महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्त्या आणि निराधार महिला. ह्या या योजनेसाठी पात्र आहेत. त्याबरोबर खालील अटी पूर्ण कराव्या लागतील 

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असावी.
  • किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण असावे.
  • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024 लाभ कुणाला मिळणार नाही?

 खालील महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत 

  • ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रु रुपयांपेक्षा अधिक आहे.
  • ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता (इनकम टॅक्स भरणारी) आहे. 
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु वाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष/ संचालक/सदस्य आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

सदर योजनेच्या "पात्रता" व "अपात्रता" निकपामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

Document for CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

  • योजनेच्या लाभासाठी भरलेला ऑनलाईन अर्ज.
  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य).
  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • रेशनकार्ड.
  • सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024 निवड कशी केली जाते 

"मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडीसे विका/ पर्यवेक्षिका/ मुख्यसेविका/ सेतू सुविधा केंद्र/ ग्रामपंचायत/ ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जवावदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

नियंत्रण अधिकारी आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी "नियंत्रण अधिकारी" राहतील. तसेच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई हे "सहनियंत्रण अधिकारी" राहतील.

CM -Mazi Ladki Bahin Yojana 2024 योजनेची कार्यपध्दती

अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/ मोवाइल App द्वारे/ सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे

पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.ज्या  महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी "अर्ज" भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ ग्रामीण/ आदिवासी)/ ग्रामपंचायत/वार्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.

वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ ग्रामीण/ आदिवासी)/ सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.

अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.

अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.

कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)

स्वतःचे आधार कार्ड

तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा मोबाईल अँपवर जाहीर केली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी केंद्र/ ग्रामपंचायत/ वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आक्षेपांची पावती

जाहीर यादीवरील हरकत पोर्टल/ App द्वारे प्राप्त केल्या जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र यांचेमार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत/तक्रार नोंदवता येईल. लेखी (ऑफलाईन) प्राप्त झालेल्या हरकत/तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून 05 दिवसांपर्यंत सर्व हरकत/तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.

सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली "तक्रार निवारण समिती" गठीत करण्यात येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतिम यादीचे प्रकाशन: 

सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन, पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र/अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/वॉर्ड स्तरावर / सेतू सुविधा केंद्र, तसेच पोर्टल/ App वर देखील जाहीर केली जाईल.

पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.

अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना GR पहा 

1 Comments

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now