Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala: राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२' हे अभियान राबविणेबाबत नुकतेच शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मध्ये राज्यातील विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या उत्तुंग यशामुळे 2024-25 मध्ये देखील Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala-टप्पा 2 हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार आहे.
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala |
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा दूसरा टप्पा जाहीर; पहा संपूर्ण माहिती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता राबविण्यात आले.
या अभियानास राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान वैशिष्ट्ये
- सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांचा सहभाग असतो
- यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकम मिळते.
- रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा असते
- विद्यार्थी शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैत्यन निर्माण होते
- विद्यार्थी शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळते.
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Tappa-2
- उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता सन 2024-25 देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा 2 हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येणार आहे. शासन निर्णय पहा
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची व्याप्ती-:
- राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे.
- या अभियानासाठी शाळांची विभागणी
- शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा
- उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे.
याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्य स्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
- बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र
- वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच
- उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची उद्दिष्टे
- शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे.
- शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे.
- शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा कालावधी
- दि. 29 जुलै ते दि.04 ऑगस्ट, 2024 हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वतोपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावेत.
- दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दि.04 सप्टेंबर 2024 रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल.
- दिनांक 05 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी.
- त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल.