DTP Maharashtra Bharti 2024: शासनाच्या नगर रचना विभागात दहावी पासवर नवीन भरती सुरु; फॉर्म करा

 DTP Maharashtra Bharti 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे कारण महाराष्ट्र शासनाच्या Nagar Rachana Vibhag Bharti 2024 अंतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Maha DTP Recruitment 2024 विषयी संपुर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

DTP Maharashtra Bharti 2024
DTP Maharashtra Bharti 2024

DTP Maharashtra Bharti 2024: शासनाच्या नगर रचना विभागात दहावी पासवर नवीन भरती सुरु; फॉर्म करा 

महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये अराजपत्रित गट ब च्या 289 जागांवर सरळ सेवा भरती केली जाणार असुन त्यासाठी लागणारी किमान शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, फॉर्म भरण्याचा कालावधी  यां विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

Nagar Rachana Vibhag Bharti 2024 पदांची संख्या 

  • रचना सहायक - 261 जागा 
  • उच्चश्रेणी लघुलेखक - 09 जागा 
  • निम्नश्रेणी लघुलेखक - 19 जागा 
  • एकूण रिक्त जागा - 289
  • वरील जागेपैकी 13 जागा दिव्यांग उमेदवारसाठी राखीव आहेत.

DTP Maharashtra Bharti 2024 फॉर्म भरण्याचा कालावधी 

नगररचना व मूल्य निर्धारण विभागासाठी केवळ ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरता येणार आहेत. 30 जुलै 2024 रोजी सकाळी 11:00 वाजलेपासून ते 29 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहेत. तर परीक्षा शुल्क दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत भरता येणार आहेत.

ऑनलाइन फॉर्म भरा

Nagar Rachana Vibhag Bharti 2024 Exam Fees 

नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग भरती साठी खुल्या संवर्गातील उमेदवारांना 1000/- तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900/- रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.

Maha DTP Recruitment 2024  शैक्षणिक पात्रता 

  • रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित

या पदासाठी उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तूशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

  • उच्चश्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित 

या पदासाठी उमेदवार इयत्ता 10 वी (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा) उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा येग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक.

  • निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपत्रित

या पदांसाठी उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय बाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक आहे 

Nagar Rachana Vibhag Bharti 2024 Exam 

रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ऐन वेळी कोणते बदल झाल्यास नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या https://dtp.maharashtra.gov.in/ यां वेबसाईट वर सूचना देण्यात येणार आहेत.

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now