RTE Admission Maharashtra 2024-25: आरटीई कागदपत्रे पडताळनी सुरु; ही कागदपत्रे विसरू नका

RTE Admission Document Verification 2024-25: 'आरटीई प्रवेश' साठी आता पालकांची लगबग सुरु झाली आहे. RTE Admission ची यादी नुकतीच जाहीर झाली असून त्यात तब्ब्ल 93009 विद्यार्थ्यांना 22 जुलै 2024 पासून कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. कागदपत्रे पडताळणी साठी घेऊन जाताना पालक गोंधळून जाऊ नये म्हणून  RTE Admission Maharashtra 2024-25 साठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

RTE Admission Maharashtra 2024-25
RTE Admission Maharashtra 2024-25

RTE Admission Maharashtra 2024-25: आरटीई कागदपत्रे पडताळनी सुरु; ही कागदपत्रे विसरू नका

यंदा राज्यातून 2 लाख 42हजार 516 पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता. त्यापैकी 93 हजार 9 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र करून लॉटरी जाहीर केली आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

RTE Admission Schedule 

अनुतपशीलकालावधी
01लॉटरीचा SMS22 जुलै 2024
02प्रमाणपत्र पडताळणी23 ते 31 जुलै 2024
03प्रत्यक्ष प्रवेश23 ते 31 जुलै 2024

RTE प्रवेश महत्वाच्या सूचना

  • सर्वप्रथम आपण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढावे. 
  • Admit Card प्रिंट करण्यासाठी पोर्टलवरील Application Wise Details / अर्जाची स्थिती वर क्लिक करून आपला फॉर्म नंबर लहून Go वर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला Admit card View and Print वर क्लिक करून प्रिंट करावी.
  • Admit card वरील शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या वरील बाजूस असलेली सर्व कागदपत्रे (मूळ व झेरॉक्स) दोन प्रतिमध्ये सोबत ठेवावे.
  • त्याचबरोबर RTE वेबसाईटवरून हमीपत्र Self Declaration वर क्लिक करून त्याचीही प्रिंट घ्यावी.
  • आपण भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढावी.
  • कागदपत्रे पडताळणीसाठी आपल्या Admit Card वर खालच्या बाजूस पत्ता दिलेला आहे त्या ठिकाणी सर्व कागदपत्रे घेऊन पडताळणी करून घ्यावीत.
  • RTE Admit कार्डवरील महत्वाच्या सूचना बारकाईने वाचावे. 

RTE Admission Documents

  • ऑनलाइन भरलेला  फॉर्म  
  • ADMIT CARD / प्रवेश पत्र 
  • जन्माचा दाखला Birth Certificate 
  • निवासाचा पुरावा  Address Proof
  • जातीचे प्रमाणपत्र Caste Certificate (आवश्यक असल्यास )
  • उत्पनाचे प्रमाणपत्र INCOME Certificate (आवश्यक असल्यास )
  • इतर अनुषंगिक प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास )
  • घटस्फोटीत असल्यास घटस्फोटाचे प्रमाणपत्र
  • विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र 
  • अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र 
  • दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र 
  • कोव्हीड प्रभावित असल्यास कोव्हीड प्रमाणपत्र 
  • इतर आरक्षण पात्र असल्यास त्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.

लक्षात असावे - कागदपत्रे पडताळणी केवळ ज्यांना लॉटरीचा SMS आला आहे त्यांचेच Document Verification  होत असते.  प्रतीक्षा यादीत असलेल्या बालकांचे कागदपत्रे आताच  तपासले जाणार नाहीत.

Please do not entre any spam link in the comment box.

إرسال تعليق (0)
أحدث أقدم
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now