Ladki Bahin Yojana Update 2024: मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ; पहा पुढची तारीख

 Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेबाबत मा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची घोषणा केली. त्यानुसार मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.  Ladki Bahin Yojana Update 2024 संदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदन केले.

Ladki Bahin Yojana Update 2024
Ladki Bahin Yojana Update 2024  

 Ladki Bahin Yojana Update 2024: मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ; पहा पुढची तारीख 

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या मुदतववाढ 

सदर Ladki Bahin Yojana मध्ये अर्ज करण्याची मुदत दि. 1 जुलै 2024  ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि. 31ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. 

Ladki Bahin Yojana लाभ कधीपासून मिळणार 

तसेच दि. 31ऑगस्ट, 2024  पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि. 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना फॉर्म डाउनलोड करा 

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना तालुका आदेश 

Ladki Bahin Yojana रहिवासी प्रमाणपत्र 

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी खालील कागदपत्र जोडावे. 

  • 15  वर्षापूर्वीचे रेशन कार्ड 
  • मतदार ओळखपत्र 
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 
  • जन्म दाखला या ४ पैकी कोणते ही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

Ladki Bahin Yojana शेतीची अट वगळली 

  • सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana वयोमार्यादा बदल  

  • सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60  वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana परराज्य विवाह बद्दल 

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे खालील कागदपत्र जोडावे. 

  • जन्म दाखला 
  •  शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 
  • आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

Ladki Bahin Yojana उत्पन्नाची अट 

  • रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

Ladki Bahin Yojana अविवाहित महिला 

  • सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे

.


Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now