Government Hostel Admission form Online 2024 - 25 : नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना निवसाची, भोजनाची, निर्वाह भत्यासह संपूर्ण सुविधा पुरविल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांना निवसाच्या उत्तम सोयीसह शिक्षण पूर्ण करावयाचे आहे अशा मुलांनी खाली दिलेल्या लिंकवरून Government Hostel Admission 2024 - 25 साठी ऑनलाईन फॉर्म भरावा.
Government Hostel Admission 2024-25 |
Government Hostel Admission 2024-25: शासकीय वसतिगृह ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु; अर्ज करा
शासकीय वसतिगृहाचे सन 2024-25 साठीचे प्रवेश हे इयत्ता 10 वी पासून पुढील वर्षासाठी दिल जाणार आहे.
Government Hostel Admission 2024-25 साठी फॉर्म कसा भरावा?
सदर फॉर्म हे ऑनलाईन भरावयाचे असून फॉर्म भरण्यासाठी https://hostel.mahasamajkalyan.in/ या वेबसाईट वरून भरावे लागेल.
Government Hostel Admission 2024-25 साठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत?
सदरील वसतिगृहात प्रवेशासाठी मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत ज्यामध्ये खालील संवर्गाचा समावेश आहे.
- अनुसूचित जाती (SC)
- अनुसूचित जमाती (ST)
- विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT)
- विशेष मागास प्रवर्ग (SBC)
- आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय (EWS)
- इतर मागासवर्गीय OBC
- अनाथ (Orphan)
- दिव्यांग (PWD)
Government Hostel Admission 2024-25 अर्जाची तारीख
2024-25 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह नवीन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता शेवटची तारीख दि. 15 जुलै 2024 आहे. या तारखेच्या पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा.
Government Hostel Admission 2024-25 कोणत्या अभ्यासक्रमाला मिळते?
10 वी पासून पुढील शिक्षणासाठी Government Hostel Admission 2024-25 मध्ये प्रवेश मिळेल. त्यामध्ये व्यावसायिक बिगर व्यावसायिक अशा सर्व अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
शासकीय निवासी वसतिगृह योजना राबविणे मागची उद्दिष्टे
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत.
शासकीय निवासी वसतिगृह योजनेचे लाभाचे स्वरूप
- मोफत निवास व भोजन, अंथरूण-पांघरूण, ग्रंथालयीन सुविधा.
- शालेय विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी दोन गणवेष.
- क्रमिक पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी.
- वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, अँप्रन, ड्रॉईंग बोर्ड, बॉयलर सूट व कलानिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी रंग, ड्रॉईंग बोर्ड , ब्रश कॅनव्हास इ.
- वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता सुद्धा दिला जातो.
शासकीय निवासी वसतिगृह अटी व शर्ती
- शासकीय निवासी वसतिगृह प्रवेश योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील अटी व शर्ती लागू असतील
- गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे, वार्षिक उत्पन्न रु. 2 लाख पेक्षा जास्त नसावे.
- इयत्ता 10 वी व त्यापुढे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.
- अर्ज करावयाची मुदत शालेय विद्यार्थ्यांसाठी 15जून 2024 पर्यंत आहे.
- सन 2014-15 पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात जागेपैकी 10% प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागा ह्या खासबाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून व गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आणि 5% खासबाब म्हणून अनाथ तसेच मांग भंगी, मेहकर या जातीतील लाभार्थ्यांसना प्राधान्य् देण्यात येते.