RTE 25% Admission 2024-25: शाळांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात बुधवार दि. 12 जून 2024 रोजी होणारी सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार आज गुरुवार दि.13 जून 2024 रोजी याचिकेवर अंतरिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत लॉटरीला एक आठवड्याचा कालावधी होत आला असून प्रवेश प्रक्रियेला विलंब होत असल्याने पालक चिंतीत आहे. याविषयी शासनाच्या वतीने खालील अपडेट देण्यात आली आहे.
RTE 25% Admission 2024-25 |
RTE 25% Admission 2024-25: आरटीई प्रवेशाची मोठी अपडेट; या कारणामुळे होतोय उशीर
राज्य शासनाने आरटीई कायद्यात सुधारणांच्या नावे फेब्रुवारीमध्ये बदल केला होता. त्यास पालकांसह विविध राजकीय पक्ष, संघटनांनी विरोध केला. या बदलाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दि.06 मे रोजी न्यायालयाने शासनातर्फे कायद्यात केलेल्या बदलास स्थगिती दिली आणि जुन्या नियमाप्रमाणे ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली. तसेच प्रवेश अर्ज मागवून घेत दि.07 जून रोजी पुण्यातील एससीईआरटी येथे ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली.
RTE 25% Admission 2024-25: आरटीई प्रवेशाची मोठी अपडेट
खाजगी शाळांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीमुळे लॉटरीच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. गुरुवारी होणाऱ्या सुनावणीनंतर न्यायालयाच्या - आदेशानुसार पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
RTE 25% Admission 2024-25 या कारणामुळे होतोय उशीर
RTE 25% Admission 2024-25 |
Plz fast give result
ردحذف