या विभागातील हजारो जागांच्या भरतीची सर्व जाहिराती रद्द - Mahatransco Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) वतीने जाहिर सूचना काढण्यात आली आहे. यामुळे काही संवर्गातील उमेद वाराना दिलासा तर काहीचा हिरमोड होणार आहे. कारण   महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित Mahatransco Recruitment 2023 भरती वर्ष 2023 व 2024 मध्ये खालील विविध पदांच्या हजारो जागांची भरतीसाठी  जाहिराती प्रकाशित केलेल्या आहेत. त्या सर्व खाली दिलेल्या कारणामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. 

Mahatransco Recruitment 2023
Mahatransco Recruitment 2023

या विभागातील हजारो जागांच्या भरतीची  सर्व जाहिराती रद्द -  Mahatransco Recruitment 2023

महापारेषण अंतर्गत विविध पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यातील खाली दिलेल्या क्रमांकाच्या  जाहिराती रद्द करण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात क्र पदाचे नाव
04/2023 कार्यकारी अभियंता (पारेषण)
05/2023 अति. कार्यकारी अभियंता (पारेषण)
06/2023 उप कार्यकारी अभियंता (पारेषण)
07/2023 सहायक अभियंता (दूरसंचार)
07/2023 सहायक अभियंता (पारेषण)
08/2023 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली )
08/2023 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली )
08/2023 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली )
09/2023 विद्युत सहायक (पारेषण) कंत्राटी
01/2024 सहायक अभियंता (पारेषण)
02/2024 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली )
02/2024 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली )
02/2024 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली )

Mahatransco Recruitment 2023 च्या वतीने  सदर पदांची भरती प्रक्रिया विविध टप्यांवर असतांना, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, 2024 दि. 06 फेब्रुवारी 2024 पासून अमलात आला आहे. सदर अधिनियमान्वये "सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग" निर्माण करून सदर वर्गासाठी सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये आरक्षण विहित करण्यात आले आहे.

Mahatransco Recruitment 2023

सबब, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, 2024 ची अमलबजावणी करण्याकरीता सदर जाहिराती रद्द करण्यात येत आहेत. एसईबीसी आरक्षण विचारात घेऊन नवीन सुधारीत बिंदूनामावलीप्रमाणे

Mahatransco bharti 2023

प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या मागणीपत्रानुसार सदर पदांसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन नव्याने भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

याविषयाचे सूचनापत्र कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावर "भरती सुचना" व "करियर आणि भरती सुचना" या लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Please do not entre any spam link in the comment box.

إرسال تعليق (0)
أحدث أقدم
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now