मोफत टॅब व दररोज ६जीबी इंटरनेट डाटा: होय, शासनाची एक खास योजना आहे ज्यामधून विद्यार्थ्याना मोफत टॅब व दररोज ६जीबी इंटरनेट डाटा मिळणार आहे त्यासाठी खालील पात्र विद्यार्थ्याना फॉर्म भरावे लागणार आहे. मागील वर्षी राज्यभरात दहा हजारच्या जवळपास विद्यार्थ्याना Mahajyoti Free Tablet Yojana मधून मोफत टॅब व दररोज ६जीबी इंटरनेट डाटा दिल गेला आहे. काय आहे Mahajyoti Free Tablet Yojana वाचा आणि लगेच फॉर्म भरा.
Mahajyoti Free Tablet Yojana |
फॉर्म भरा; विद्यार्थ्याना मिळणार मोफत टॅब व दररोज ६जीबी इंटरनेट डाटा: Mahajyoti Free Tablet Yojana
महाराष्ट्र राज्यातील JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी
Mahajyoti Free Tablet Yojana च्या लाभासाठी पात्रता
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
- विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी.
- सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.
- इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्याथ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.
मिलिटरी भरती मोफत ट्रेनिंग फॉर्म
Required Document For Mahajyoti Free Tablet Yojana
- आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- 10 वी ची गुणपत्रिका
- विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
- दिव्यांग असल्यास दाखला
- अनाथ असल्यास दाखला
समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-
Mahajyoti Free Tablet Yojana |
- प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
- दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.
- अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
Note :- शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल.
Mahajyoti Free Tablet Yojana How to Apply अर्ज कसा करावा
अटी व शर्ती Mahajyoti Free Tablet Yojana
- अर्ज करण्याची अंतिम दि. 10/07/2024 आहे.
- पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
- कोणत्याही माध्यमातून व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र 0712-2870120/21
- E-mail Id: mahajyotimpsc21@gmail.com