राज्य शिक्षक पुरस्कार 2023-24: शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत.
State Level Teacher Award 2023-24 |
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार २०२३ - २४ ऑनलाईन प्रस्ताव सुरु | State Level Teacher Award 2023-24
सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि. 25 जून 2024 रोजी रोजी पासून सुरू होणार आहे.
या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी दि 11 जुलै 2024 रोजी पर्यंत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे.
नोंदणी लिंक
सन 2023-24 च्या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि. 25 जून 2024 रोजी रोजी पासून सुरू झाली आहे.
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सुधारित नियम शासन निर्णय
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येणार आहे त्या संदर्भात
संभाव्य वेळापत्रक
अनु क्र | कालावधी | बाब |
---|---|---|
01 | 24 जून 2024 | प्रसिद्धी करणे |
02 | 25 जून ते 11 जूलै 2023 | ऑनलाईन नोंदणी कालावधी |
03 | 12 ते 13 जुलै 2024 | संचालनालय स्तरावरील काम |
04 | 14 ते 24 जुलै 2024 | जिल्हास्तरावर प्रत्यक्ष शाळा भेट |
05 | 25 जुलै ते 01 ऑगस्ट 24 | जिल्हास्तरावर मुलाखत/पडताळणी |
06 | 05 ते 16 ऑगस्ट 2024 | राज्यस्तरावर मुलाखत/पडताळणी |
07 | 17 ते 19 ऑगस्ट 24 | संचालनालय स्तरावरील काम |
08 | 20 ते 24 ऑगस्ट 2024 | राज्य निवड समिती अंतिम बैठक |
09 | 26 ऑगस्ट 2024 | अंतिम यादी शासनास सादर करणे |
-----------