Dearness allowance 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकार कडून आनंदाची बातमी आहे. कारण अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या Dearness allowance चा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. महागाई भत्ता ४६% वरून ५०% करण्याविषयी सविस्तर माहिती व शासन निर्णय खालील प्रमाणे देण्यात आला आहे.
Dearness allowance 2024 |
Dearness Allowance 2024: महागाई भत्ता ४६% वरून ५०% GR प्रसिद्ध, फरकासाठी या महिन्यापर्यंत
DA Hike News: महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या वतीने आज DA Hike GR काढण्यात आला आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जानेवारी, 2024 पासून सुधारणा करण्यात आली आहे.
भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक: 01/01/2024 -इ.।। (बी), दिनांक 12 मार्च, 2024 या परिपत्रकाचा संदर्भ देऊन शासन निर्णय काढण्यात आला आहे.
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
Dearness allowance 2024
- त्यानुसार शासन असे आदेश देत आहे की, दिनांक 01 जानेवारी, 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46% वरुन 50% करण्यात यावा.
फरकासाठी या महिन्यापर्यंत
- सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 01 जानेवारी, 2024 ते दिनांक 30 जून, 2024 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, 2024 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.
- महागाई भत्त्याची (DA) रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
- यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.
- GR डाउनलोड करा
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 2024071052289505 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.