SET Exam Result 2024: सेट परीक्षा एप्रिल 2024 च्या निकालाबाबत सेट एजन्सी पुणेकडून प्रकटन जाहीर केले आहे. त्यानुसार आता सेट परीक्षा 07 एप्रिल 2024चा निकाल पुढील प्रक्रियेनंतर होणार आहे. SET Exam Result 2024 विषयी सविस्तर बातमी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
SET Exam 2024 Result |
SET Exam 2024 Result: सेट परीक्षा निकाला बाबत मोठी बातमी; आता यानंतरच जाहीर होणार निकाल
दि. 7 एप्रिल, 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या 39 व्या सेट परीक्षेसाठी SEBC प्रवर्गासाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत मार्गदर्शनपर पत्रव्यवहार सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून महाराष्ट्र शासनास करण्यात आला आहे.
SET Exam 2024 Result
शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. परंतू सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गाची माहिती मागविण्यात येत आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, 2024 अन्वये, जे विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गात समाविष्ट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Form for SEBC Candidates या शिर्षकांर्गत उपलब्ध असलेला अर्ज दि. 19 ते 25 जुलै 2025 पर्यंत भरणे आवश्यक आहे.
SEBC फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक
https://setexam.unipune.ac.in/Important_Instructions_SEBC.aspx
परिपत्रक पहा
एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर सदर मार्गदर्शनाच्या अधीन राहून दि. 7 एप्रिल, 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी.