RTE Admission Date 2024-25: अखेर... आरटीई प्रवेशाला मुहूर्त; यादी या दिवशी जाहीर होणार

RTE Admission Date  2024-25: सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार RTE Admission Date  2024-25 संपूर्ण  वेळापत्रक खाली दिले आहे. 

RTE Admission Date  2024-25
RTE Admission Date  2024-25

RTE Admission Date  2024-25: अखेर... आरटीई प्रवेशाला मुहूर्त; यादी या दिवशी जाहीर होणार 

उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे  सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली नव्हती.

आता RTE Admission बाबतची मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी जन हित याचिका व रिट याचिकेवर दिनांक 19 जुलै 2024 रोजी अंतिम निर्णय दिला आहे. त्यानुसार  सन २2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक 07 जून 2024 रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी दिनांक उद्या दिनांक 20 जुलै 2024  रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. 

मोबाईलवर आरटीई एसएमएस कधी येणार?

या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार दिनांक 22 जुलै 2024  पासून SMS जाण्यास सुरुवात होईल. 

RTE Admission 2024-25 Lottery Massage 

जर एखाद्या पालकांना मॅसेज नाही आला तर खालीलप्रमाणे आपण आपल्या अर्जाची खात्री करू शकता.

  • त्यानंतर अर्जाची स्थिती ( Application Status) यावर क्लिक करावी.

  • आलेल्या जागेत आपला Application Number लिहून सबमिट करावे. 
  • त्यानंतर आपल्या समोर आपल्या अर्जाची स्थिती दिसेल.
  • त्यात तुम्ही पाहू शकाल आपला कोणत्या शाळेमध्ये निवड झाली आहे.

आरटीई प्रवेश काढीपासून सुरू?

प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालकांनी दिनांक 23 ते 31 जुलै 2024 पर्यंत आपल्या जिल्हयातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करुन पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करुन घेण्याबाबत सूचना देण्यात याव्यात

RTE PORTAL वरील सूचना 

आपणांस कळविण्यात येते की, सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी आपल्या जिल्हयातील सर्व तालुकास्तरावरील पडताळणी केंद्राची तपासणी करुन पडताळणी केंद्र अपडेट करण्यात यावी, पालकांना अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्र. टाकून अर्जाची स्थित्ती पहावी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील सूचनांचे पालन करावे अशा सूचनांना आपल्यास्तरावरुन मोफत


Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now