RTE Admission 2024-25: अनेक दिवसापासून रखडलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रिया आता गती घेतली आहे. दिनांक 20 जुलै 2024 रोजी RTE Admission Lottery ची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये नाव पाहताना अनेक पालकांना अडचणी येऊ शकतात म्हणून RTE online Admission 2024-25 आरटीई लॉटरी मध्ये आपल्या पाल्याचा नंबर लागला किंवा नाही हे पाहण्यासाठी खालीलप्रमाणे सोपी पद्धत सांगण्यात आली आहे.
RTE online Admission 2024-25 |
RTE online Admission 2024-25: आरटीई लॉटरी साठी नंबर लागला किंवा नाही अशी खात्री करा
आपणांस माहित आहे की राज्यभरामध्ये 93 हजार 9 विद्यार्थ्यांची पाहिली निवड यादी शासनाच्या वतीने RTE Portal वर जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर 71 हजार 276 विद्यार्थ्यांची वेटिंग यादीही जाहीर करण्यात आली आहे.
- लाडका भाऊ योजना नोंदणी सुरू नोंदणी करा
RTE Admission 2024-25
शासनाकडून आलेल्या सूचनानुसार आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 साठी निवड यादीतील पात्र बालकांना सोमवार दिनांक 22 जुलै 2024 पासून मोबाईलर SMS येणार आहेत. परंतु पालकांनी त्यावर अवलंबून न राहता खालीलप्रमाणे दिलेल्या सूचनेनुसार आपल्या मुलाची लॉटरी लागली अथवा नाही हे खात्री करून घ्यावी
- प्रथम RTE पोर्टल https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new वर क्लिक करावे.
- आलेल्या वेबपेजवर काही सूचना आहेत त्या खाली वेगवेगळे टॅब दिले आहेत.
- त्या टॅबपैकी Application wise Details / अर्जाची स्थिती हा टॅब आहे.
- Application wise Details / अर्जाची स्थिती वर क्लिक करावे.
- त्याखाली Application No विचारला जाईल. तिथे आपल्या बालकाचा फॉर्म नंबर लिहावा आणि Go बटन वर क्लिक करावे.
- लगेच खाली जर आपल्या बालकाचा नंबर लागला असेल तर शाळेचा युडायस नंबर, शाळेचे नाव, निवड रेग्युलर की वेटिंग ही सर्व माहिती मिळेल.
जर कोणत्याही शाळेत लागला नसेल तर आपण पुन्हा त्याचं पेज वरील waiting List या टॅब वर क्लिक करून प्रतीक्षा यादीमध्ये नंबर आहे का पाहावे.