Maharashtra Anganwadi Bharti 2024: शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यामध्ये अंगणवाडी मदतनीस भरती (Anganwadi Helper ) करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील Anganwadi Bharti साठी लागणारी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. खलील माहिती वाचून दिलेल्या तारखेपर्यंत आपले अर्ज खाली दिलेल्या पत्यावर आपल्या कागदपत्रांसह जमा करावे.
Maharashtra Anganwadi Bharti 2024 |
Maharashtra Anganwadi Bharti 2024: जिल्ह्यात अंगणवाडी मदतनीस पदांची तालुकानिहाय भरती सुरु; अर्ज करा
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी मदतनीस पदाच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा रत्नागिरी अंतर्गत खालील दिलेल्या तालुक्याच्या यादीनुसार अंगणवाडी मदतनीस पदाची भरती केली जाणार आहे. Ratnagiri Anganwadi Bharti 2024
- लाडका भाऊ योजना नोंदणी सुरू नोंदणी करा
अंगणवाडी मदतनीस पदाची तालुकानिहाय जागा
तालुका | अंगणवाडी मदतनीस | |
---|---|---|
खेड | 01 | |
राजापूर | 02 | |
लांजा | 03 | |
मंडनगड | 01 | |
मालवण | 03 | |
वेंगुर्ला | 01 | |
एकूण | 11 |
शैक्षणिक पात्रता
- वरील पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारे महिला उमेदवार वरील संबंधित तालुक्यातील हद्दीतील रहिवासी असावे.
- अर्जदार महिलांचे वय 18 ते 35 वर्षे असावे.
- विधवा महिलाना 40 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येईल.
- वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. दोन किंवा दोन पेक्षा जास्त अपत्य नसावी. [Maharashtra Anganwadi Bharti 2024]
- मागासवर्गीय उमेदवारांनी जाती चे प्रमाणपत्र जोडावे
- एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेगळा अर्ज सादर केल्यास ते विचारात घेतले जाणार नाहीत.
- मराठी भाषेचे ज्ञान असावे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन
अर्थसंकल्प 2023 मध्ये जाहीर केल्यानुसार खालील प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका याना मानधन खालीलप्रमाणे राहील त्याशिवाय इतर कोणतेही भत्ते दिली जाणार नाहीत. Maharashtra Anganwadi Recruitment 2024
- अंगणवाडी सेविका मानधन 10,000 रु,
- मिनी अंगणवाडी सेविका मानधन 7,200 रु.
- अंगणवाडीस मदतनीस मानधन 5,500 रुपये
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी व ठिकाण
- पात्र व इच्छुक महिला उमेदवारांनी खालील जाहिरातीसोबत जोडलेला अर्ज पूर्णपणे भरून व आवश्यक कागदपत्रे जोडून 26/07/ 2024 रोजी सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत खालील दिलेल्या ठिकाणी जमा करावा.
- अर्ज मिळण्याचेव जमा करण्याचे ठिकाण : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कंपाऊंड , जेल रोड रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी येथे सादर करावे.