मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या अंमलबजावणी संदर्भात महत्वाची बातमी आहे. Mazi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचे आजपासून फॉर्म सुरु झाले आहेत. परंतु महिलांना ते भरता येत नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फॉर्म कसा आणि कुठे भरावा याबाबत सविस्तर माहिती पहा.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 |
Mukhyamantri Mazi Ladki Bahin: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे महिलानी असा भरावा फॉर्म
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी बाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी आणि सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी असे निर्देश या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी बैठकीत दिले.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin योजनेचा उद्देश
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यात यावी अशा सूचनाही या बैठकीत दिल्या.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin पहिला टप्पा
21 वर्षाच्या पुढील आणि 60 वर्षाच्या आतील महिला लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा 01 जुलै ते 15 जुलै 2024 या कालावधीत असणार आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin कधीपर्यंत सुरु राहील?
पहिल्या टप्प्यानंतर Mukhyamantri Mazi Ladki Bahin form भरण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहील.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin form कुठे भरावा
पात्र महिला भगिनीनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात.
यानतर या प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर करावेत. तसेच, ज्या पात्र महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप उद्यापासून सुरू करण्यात येत आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
निवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला अशा आवश्यक दाखल्यांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी. यासाठी गावपातळीवर विशेष शिबीरांचे आयोजन करणे आवश्यक असल्यास करावे. तसेच, जिल्हापातळीवर बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असेही स्पष्ट निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जलदगतीने काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.