Udaan Scholarship 2024: शिक्षणासाठी शासन व सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत आहे. केवळ शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून हे सर्व प्रयत्न करण्यात येत असतात. अशाच एका प्रतिष्ठान कडून Udaan Scholarship Scheme 2024 देण्यात येणार आहे. उडान शिष्यवृत्ती योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत? अर्ज कसा करावा या विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Udaan Scholarship 2024 |
Udaan Scholarship 2024: उडान शिष्यवृत्ती योजना; पात्र विद्यार्थ्यांना एक लाख शिष्यवृत्ती मिळणार
GSP India च्या एका विशेष उपक्रमामधू विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान GSP India ही संस्था मागील 42 वर्षांपासून ग्रामीण भागातील अपंग युवकांसाठी काम करणारी संस्था आहे.
उडान शिष्यवृत्ती योजना ही SKF India, Sandvik Coromant आणि Atlas Copco यांच्या सहयोगाने खास महाराष्ट्रातील अपंग युवकांसाठी “उडान शिष्यवृत्ती योजना” अपंग विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
Udaan Scholarship 2024
- राज्यातील दिव्यांग (अपंग) विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
- या शिष्यवृत्ती कार्यक्रमात महाराष्ट्रातील निवडक अपंग विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीनंतरच्या शिक्षणासाठी सहाय्य केले जाणार आहे.
Udaan Scholarship 2024 पात्रता
उडान शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असावा.
- विद्यार्थी दिव्यांग (अपंग) असावा.
- दिव्यांग (अपंगत्वाचे) प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी 11वी किंवा डिप्लोमाला प्रवेश घेतला असेल तर 10 वी मध्ये कमीत कमी 60% गुण आवश्यक आहे.
- विद्यार्थी पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला असेल तर 12 वी मध्ये कमीत कमी 60% गुण आवश्यक आहेत.
उडान शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करावा?
- खाली दिलेल्या नावनोंदणीच्या लिंक वरून फॉर्म भरून नावनोंदणी करावी.
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला विस्तृत अर्ज सादर करण्यासाठी लिंक मिळेल.
कोणत्या प्रकारचे सहाय्य तुम्हाला मिळेल?
- तुमच्या शिक्षणासाठीचे संपूर्ण शैक्षणिक सहाय्य
- एक लाखापर्यंत आर्थिक तरतूद
- गरजे नुसार सहाय्यक उपकरणे
- सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गदर्शन, क्षमता बांधणी आणि करिअर समुपदेशन
चला तर मग लवकरात लवकर नावनोंदणी करा. तसेच जर तुम्ही तुमच्या संपर्कातील गरजू अपंग विद्यार्थ्यांना ओळखत असाल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती आवर्जून पोहचवा.
- नावनोंदणीची शेवटची तारीख: 15 जुलै 2024
उडान शिष्यवृत्ती योजना अधिक माहितीसाठी :
हेल्पलाईन क्रमांक - 8554830064
ईमेल - udaan@gspindia.org
वेबसाइट- www.gspindia.org