Ekatmik Bal Vikas Prakalp अंतर्गत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी मदतनीसांची भरती केली जाणार आहे. राज्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये अंगणवाडी मदतनीस भरती (Anganwadi Helper) करिता 31 ऑगस्ट 2024 पर्यन्त जाहिरात व भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. Anganwadi Madatnis Bharti 2024 साठी लागणारी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. खालील माहिती वाचून आवश्यक कागदपत्र जमा करावे. जेणेकरून भरतीच्या वेळी अपूर्ण कागदपत्रामुळे फॉर्म अडचणी निर्माण होणार नाही.
Anganwadi Madatnis Bharti 2024 |
Anganwadi Madatnis Bharti 2024 : राज्यात १४ हजार ६९० अंगणवाडी मदतनीसांची भरती, महिलाना सुवर्णसंधी
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका हे पद कार्यरत आहेत. त्यापैकी अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदाच्या भरती साठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 31 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर दिल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. इच्छुक महिलांनी अर्ज करावा असेही जाहीर केले आहे.
Anganwadi Madatnis Bharti 2024
शैक्षणिक पात्रता
- वरील पदासाठी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारे महिला उमेदवार वरील संबंधित तालुक्यातील /नगरपरिषद हद्दीतील रहिवासी असावे.
- अर्जदार महिलांचे वय 18 ते 35 वर्षे असावे.
- विधवा महिलाना 40 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येईल.
- वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. दोन किंवा दोन पेक्षा जास्त अपत्य नसावी. [Maharashtra Anganwadi Bharti 2024]
- मागासवर्गीय उमेदवारांनी जाती चे प्रमाणपत्र जोडावे
- एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा लागतो. उमेदवाराने एकापेक्षा जास्त वेगळा अर्ज सादर केल्यास ते विचारात घेतले जात नाहीत.
- मराठी भाषेचे ज्ञान असावे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन
अर्थसंकल्प 2023 मध्ये जाहीर केल्यानुसार खालील प्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका याना मानधन खालीलप्रमाणे राहील त्याशिवाय इतर कोणतेही भत्ते दिली जाणार नाहीत.
- अंगणवाडी सेविका मानधन 10,000 रु,
- मिनी अंगणवाडी सेविका मानधन 7,200 रु.
- अंगणवाडीस मदतनीस मानधन 5,500 रुपये