Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर च्या वतीने 47 जागांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये शिपाई, लिपिक इंजिनियरसह विविध पदांचा समावेश आहे. Shri Tuljabhavani Temple Sansthan Recruitment 2024 ची परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली असून त्याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Tuljabhavani Sansthan Recruitment 2024 |
Tuljabhavani Sansthan Recruitment 2024: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, भरतीची तारीख जाहीर; इथे पहा परीक्षेची तारीख
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जि. धाराशिव च्या वतीने महत्वाची सुचना जारी करण्यात आली आहे ती म्हणजे अशी की, सर्व परीक्षार्थी उमेदवारांना कळविण्यात येते की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर जि. धाराशिव येथील पदभरती जाहिरात क्रमांक 01/2024 संदर्भातील परीक्षा दिनांक 13 जुलै 2024 व दिनांक 14 जुलै 2024 रोजी होणार आहे.
Tuljabhavani Sansthan Recruitment 2024
Tuljabhavani Sansthan Recruitment 2024 |
सदरील परीक्षा IBPS मार्फत ऑनलाइन होणार आहे, तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी IBPS च्या https://www.ibps.in वेबसाईटला भेट द्यावी. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती.
.
Tuljabhavani Trust Recruitment 2024 Vacancy
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत सरळसेवा पद्धतीने भरल्या जाणाऱ्या विविध पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आले आहे.
- सहायक व्यवस्थापक (धार्मिक): 01
- नेटवर्क इंजिनियर: 01
- हार्डवेअर इंजिनिअर: 01
- सॉफ्टवेअर इंजिनियर: 01
- लेखापाल :01
- जनसंपर्क अधिकारी: 02
- मास मीडिया प्रमुख: 01
- अभिरक्षक: 01
- भांडारपाल: 01
- सुरक्षा निरीक्षक: 01
- स्वच्छता निरीक्षक: 01
- सहाय्यक जनसंपर्क अधिकारी: 02
- सहाय्यक सुरक्षा निरीक्षक: 06
- सहाय्यक स्वच्छता निरीक्षक: 02
- प्लंबर: 01
- मिस्त्री: 01
- वायरमन: 02
- लिपिक टंकलेखक: 10
- संगणक सहाय्यक: 01
- शिपाई: 10
- एकूण: 47 जागा