RTE Lottery Result: अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया बाबत पालकासाठी आनंदाची बातमी आहे. कारण RTE Lottery Result 2024-25 ची ऑनलाईन सोडत जाहीर करण्याची तारीख निश्चित झाली आहे. RTE Lottery Result Date आणि महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे..
RTE Lottery Result |
RTE Lottery Result: आरटीई लॉटरीची तारीख जाहीर; या तारखेला जाहीर होणार पहिली सोडत..!!!
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) खाली दिलेल्या तारखेला जाहीर करण्यात येणार आहे.
RTE Lottery Result Date
RTE 25% Admission Lottery शुक्रवार दिनांक 07 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) SCERT PUNE येथे काढण्यात येणार आहे.
सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे आणि ऑनलाईन युट्यूब द्वारे करण्यात येणार आहे. आपण स्वतः या ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहू शकता .
आपणांस व्ही. सी ची किंवा युट्यूब ची लिंक खालील प्रमाणे देण्यात येईल.
RTE लॉटरी लिंक