BARTI Application Form 2024: महाराष्ट्र राज्यातील खालील पात्र उमेदवारांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागविणेबाबत शासनाच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे. JEE NEET BARTI 2024 ची संपूर्ण माहिती आणि फॉर्म भरण्यासाठी BARTI Login लिंक खालीलप्रमाणे शेवटी देण्यात आली आहे.
JEE NEET BARTI 2024 |
JEE NEET BARTI 2024: मुंबई, पुणे, लातूर,नाशिक, नागपूर & छ. संभाजीनगर येथे जेईई नीट चे फ्री क्लास; फॉर्म भरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (BARTI Pune) मार्फत महाराष्ट्रातील खालील पात्रता धारक उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे निःशुल्क अनिवासी क्लासेस योजना अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-100 व NEET-100 असे एकूण 1200 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.
BARTI Application Form 2024 Eligibility
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा (SC) दाखला व अधिवास असावा.
- उमेदवार शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये इयत्ता 11 वी (विज्ञान) चे शिक्षण घेत असावा.
- रु. 08 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असेल
- अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- उमेदवार दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.
JEE NEET BARTI Application Form 2024 RESERVATION
- महिला 30%,
- दिव्यांग (PWD) 5%,
- अनाथ-1%,
- वंचित-5% (वाल्मिकी व तत्सम जाती-होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी, इ.साठी), जागा आरक्षित असतील.
विद्यार्थी निवडीचे निकष JEE NEET BARTI SELECTION
प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता 10 वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय उमेदवारांची निवड केली जाईल.
JEE NEET Free Classes च्या अटी व शती
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024
- प्रशिक्षण कालावधी 24 महिन्यांचा राहील.
- निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान 75 टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.6000/- एवढे म्हणजे 24 महिन्यांचे 6000 x 24 + 1,44,000/- विद्यावेतन अदा करण्यात येईल.
- निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरीता प्रती विद्यार्थी रु.5000/- एवढी एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल.
JEE NEET BARTI 2024 Form Link
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. 13 जून 2024 पासून https://jee-neet.barti.co.in/public/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करावी. आधिक माहितीसाठी https://barti.in/ येथे भेट द्यावी