Cancellation UGC NET June 2024 Exam: यूजीसी नेट परीक्षा जून २०२४ केवळ २४ तासाच्या आत रद्द

Cancellation UGC NET June 2024 Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC-NET June  2024 परीक्षा OMR (पेन आणि पेपर) मोडमध्ये 18 जून 2024 रोजी देशातील विविध शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेतली. या परीक्षेला बसण्यासाठी 11लाख 21 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, 9 लाख 8 हजार विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. परंतु केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयच्या वतीने केवळ २४ तासाच्या आत  ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. Cancellation UGC NET June 2024 Exam बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. 

Cancellation UGC NET June 2024 Exam
Cancellation UGC NET June 2024 Exam

Cancellation UGC NET June 2024 Exam: यूजीसी नेट परीक्षा जून २०२४ केवळ २४ तासाच्या आत रद्द 

होय!!! ही अगदी खरे आहे की दिनांक 18 जून 2024 रोजी झालेली UGC NET June 2024 Exam आता रद्द करण्यात आली आहे. प्रथमच अबेक बदल करून घेण्यात आलेली ही परीक्षा केवळ 24 तासाच्या आत रद्द करण्यात आली आहे. 

Cancellation UGC NET June 2024 Exam

19 जून, 2024 रोजी, विद्यापीठ अनुदान आयोगाला (UGC) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या राष्ट्रीय सायबर क्राइम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटकडून परीक्षेवर काही शंकास्पद  इनपुट प्राप्त झाले. हे इनपुट प्रथमदर्शनी उपरोक्त परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाली असावी असे  सूचित करतात ज्यामुळे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की यूजीसी-नेट जून 2024 ची परीक्षा रद्द करावी. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्याचे केंद्रीय शिक्षण खात्याने जाहीर केले आहे.


NEXT DATE of UGC NET Exam

नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर एनटीए वादाच्या सापडली होती. आता यूजीसी नेट या परीक्षेतही गैरप्रकार घडल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याने एनटीएवर आणखी जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. या परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. ही परीक्षा पुन्हा कधी घेणार हे एनटीएने स्पष्ट केलेले नाही.


Please do not entre any spam link in the comment box.

إرسال تعليق (0)
أحدث أقدم
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now