RTE Online Admission Date: पालकांसाठी आनंदाची बातमी आहे. आरटीई प्रवेश प्रक्रीया २०२४-२५ बाबत आज शेवटची मुदत आज होती. त्यामध्ये आता मुदतवाढ देण्यात आली आहे. आधिक माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
RTE Online Admission Date |
RTE Online Admission Date: पालकांसाठी आनंदाची बातमी आरटीई प्रवेश ऑनलाइन फॉर्मसाठी मुदतवाढ
सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रीया शुक्रवार दिनांक १७.०५.२०२४ ते ३१.०५.२०२४ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात सुरु करण्यात आलेली होती.
- पालकासाठी ऑनलाइन फॉर्म लिंक : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
तथापि आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याच्या सुविधेस दिनांक ०४.०६.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदरची मुदतवाढ ही अंतिम असून दिनांक ०४.०६.२०२४ नंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी.
तरी पालकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी. अशी माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे-१ चे मा शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.