RTE Form Last Date: आरटीई 25% मोफत प्रवेशासाठी दुप्पट फॉर्म; उद्या शेवटची तारीख

 RTE Admission 2024-25: वंचित व दुर्बल घटकांसाठी आरटीई कायद्यातर्गत 25% मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक 17 मे ते 31 मे 2024 दरम्यान पालकांसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. RTE मध्ये यावर्षी केलेल्या बदलाला कोर्टाने स्थगती देऊन प्रवेश प्रक्रिया मागील वर्षीप्रमाणेच सुरु ठेवल्यामुळे पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. यंदा मोफत प्रवेशासाठी पालकांकडून दुप्पट फॉर्म नोंदणी करण्यात आली आहे.

RTE Form Last Date
RTE Form Last Date

RTE Form Last Date: आरटीई 25% मोफत प्रवेशासाठी दुप्पट फॉर्म; उद्या शेवटची तारीख

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी एकूण 9204 शाळांनी नोंदणी केली असून यावर्षी 1लाख 05 हजार 064 जागेसाठी RTE अंतर्गत ऑनलाईन लॉटरी पद्धतीने मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यावर्षी तब्बल 2 लाख 40 हजार च्या जवळपास पालकांनी प्रवेश नोंदणी केली आहे. 

RTE 25% Online form Link 

आरटीई 25 अंतर्गत मोफत प्रवेशाच्या नोंदणीसाठी पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login या लिंकवर क्लिक करून आपले ऑनलाईन फॉर्म विहित मुदतीत व आवश्यक कागदपत्रसह भरावे.

RTE Form Last Date 

आरटीई मोफत प्रवेशासाठी नोंदणी करण्यासाठी 31 मे 2024 ही शेवटची तारीख असून शासनाच्या वतीने तारीख वाढवून दिली जाणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे पालकांना आपले अर्ज दिनांक 31 मे 2024 पूर्वीच करावे लागणार आहे.

RTE Maharashtra Update 

आरटीई मोफत प्रवेशासाठी जिल्हा निहाय नोंदणी खालीलप्रमाणे झाली आहे.

जिल्हा  RTE जागा  एकूण अर्ज 
Ahmadnagar 3023 7288
Akola 2014 4833
Amravati 2396 6522
Aurangabad 4451 14891
Bhandara 763 1918
Bid 2149 5711
Buldana 2581 5240
Chandrapur 1516 2996
Dhule 1137 2842
Gadchiroli 484 864
Gondiya 903 2966
Hingoli 805 1769
Jalgaon 3033 7678
Jalna 1920 4995
Kolhapur 3032 3793
Latur 1865 5657
Mumbai 4534 9602
Mumbai 1455 "--""--"
Nagpur 6920 20120
Nanded 2601 8735
Nandurbar 419 839
Nashik 5271 14527
Osmanabad 1013 2341
Palghar 4773 3605
Parbhani 1564 3030
Pune 17714 47596
Raigarh 4008 7246
Ratnagiri 812 763
Sangli 1901 2322
Satara 1826 3487
Sindhudurg 293 162
Solapur 2464 5193
Thane 11339 19292
Wardha 1215 2967
Washim 953 2003
Yavatmal 1976 4688
Total 105123 238481

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now