RTE online form Date: सन 2024-25 या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (सी) (1) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने दिनांक 17 मे 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे. आता अंतिम मुदतीबाबत नवीन पत्र जारी करण्यात आले आहे.
RTE online form |
RTE online form Date: आरटीई ऑनलाइन फॉर्म अपडेट; पालकांना या तारखेपर्यंत मिळणार वेळ
शासनाच्या वतीने विभागीय व स्थानिक प्रशासनास काढलेल्या पत्रकानुसार आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाठी स्थानिक पातळीवर म्हणजेच तालुका स्तरावर पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे. या पडताळणी समितीला प्रवेश पात्र बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असलयाने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.
RTE online form Last Date
RTE online form Date ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 मे 2024 असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेश प्रक्रीया जूनमध्ये सुरु होत असल्याने आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेस दिनांक 31 मे 2024 नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.
फार्म लिंक https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
तरी पालकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी,