Senior Grade and Selected Grade Training: श्रेणी प्रशिक्षण आता होणार ऑफलाइन पद्धतीने; प्रशिक्षणात डायट संस्थेची महत्वाची भूमिका

Senior Grade and Selected Grade Training: वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून SCERT Pune  SCERT Pune  सोपविण्यात आली आहे. हे श्रेणी प्रशिक्षण  किमान 10 दिवसांचे किंवा 50  घडयाळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले आहे. यापूर्वी कोव्हिड 19  प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. मात्र महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचेकडून तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत  विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार Senior Grade and Selected Grade Training शासनाच्या वतीने खालील महत्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

Senior Grade and Selected Grade Training
Senior Grade and Selected Grade Training

Senior Grade and Selected Grade Training: श्रेणी प्रशिक्षण आता होणार ऑफलाइन पद्धतीने; प्रशिक्षणात डायट संस्थेची महत्वाची भूमिका 

वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रत्यक्ष पद्धतीने प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणाथीचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक संवत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने बरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन 2024-25  पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. 

Senior Grade and Selected Grade Training

याकरिता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी 5 तज्ञ अभ्यासक / तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.05 जून 2024  पर्यंत preservicedept@maa.ac.in या ई-मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतोल वरिष्ठ आंधव्याख्याता/अधिव्याख्याता 03  तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्हयातील इतर 02  तज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश असावा.


Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now