CCRT Training 2024: सी सी आर टी प्रशिक्षण नोंदणी सुरू; नोंदणी लिंक इथे पहा

CCRT Training 2024: सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली येथील उपसंचालक मा. राहुल कुमार यांच्या परिपत्रकानुसार सी सी आर टी प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत SCERT Pune यांच्या वतीने परिपत्रक व CCRT Training Registration link खुली करण्यात आली आहे. सी सी आर टी प्रशिक्षण नोंदणी लिंक व इतर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

CCRT Training 2024
CCRT Training 2024

CCRT Training 2024: सी सी आर टी प्रशिक्षण नोंदणी सुरू; नोंदणी लिंक इथे पहा

सी. सी. आर. टी. (CCRT- Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून 2024  ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. 

CCRT Training Registration link

CCRT Training साठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

लिंक : https://forms.gle/nYoYUjwMq1peyTkV8

शिक्षकांसाठी महत्वाच्या सूचना 

  • नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. 
  • प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. 
  • एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.
  • एका वर्षामध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एका वर्षात एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत लिंक भरू नये.
  • मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये. तसेच 52 वर्षाच्या वरील शिक्षकांनी लिंक भरू नये.
  • वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही. 
  • प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.

Training Programs to be organized during June 2024-25

जून जुलै 2024 महिन्यामध्ये होणाऱ्या CCRT Training चे वेळापत्रक खालीलप्रमाणे 

  1. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 19th June to 3rd July 2024
  2. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 20th June to 4th July 2024   
  3. Orientation Course in line with NEP 2020 Dt. 20th June to 10th July 2024
  4. Integrating Craft Skills in School Education Dt. 25th June to 4th July 2024

CCRT Training 2024 Registration link 


CCRT Training 2024

सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा. असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, येथील कला क्रीडा विभागाच्या उपसंचालक  डॉ. माधुरी सावरकर यांनी  विभागीय शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य यांना उदेशून काढलेल्या परिपत्रकामध्ये केले आहे. 

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now