RTE online Admission 2024: आरटीई ऑनलाइन भरलेला फॉर्म चुकला, घाबरू नका सोप्पं आहे; असा करा दुरस्त

राज्यभरात RTE 25% प्रवेश प्रक्रिया दिनांक 17 मे 2024 पासून सुरु झाली आहे. राज्यभरामध्ये 9 हजार 197 शाळामध्ये 1 लाख  4 हजार 738 जागा RTE 25% नुसार नामांकित शाळेमध्ये Free Admission देऊन भरल्या जाणार आहेत. यामध्ये दुर्बल व वंचित घटकातील बालकाबरोबर दिव्यांग, अनाथ,कोव्हीड प्रभावित बालके, HIV प्रभावित, घटस्फोटीत महिलांचे बालके, विधवा स्त्रियांची बालके विद्यार्थ्यांना ही प्रवेश दिला जाणार आहे.

RTE online Admission 2024
RTE online Admission 2024 

RTE online Admission 2024: आरटीई ऑनलाइन भरलेला फॉर्म चुकला, घाबरू नका सोप्पं आहे; असा करा दुरस्त

आरटीई २५% प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी दिनांक 17 ते 31 मे  2024 आहे. या दरम्यान पालकांनी ऑनलाईन भरावयाचे आहे.

RTE online Admission 2024

  • पालकांना या वर्षी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी केवळ 15 दिवस मिळणार आहेत.  अनेकदा घाई घाईने RTE Online Form भरताना चुका होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. Form भरताना चुका झाल्या तर प्रवेशावेळी त्रुटी निघू शकतात आणि विद्यार्थ्याच्या प्रवेशावर परिणाम होत असतो. त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरताना अचूक भरणे आवश्यक आहे.

  • आरटीई ऑनलाईन फॉर्म भरताना चुक झाल्यास पालक गोंधळून जातात आणि फॉर्म भरण्याचे अर्धवट सोडून देतात. त्यामुळे बालकाचे नुकसान होते. बालके पात्र असूनही त्यांना मोफत प्रवेश पासून वंचित राहू शकतात. 
  • NEW REGISTRATION करताना शक्यतो चुका होऊ शकतात. फॉर्म मध्ये Child information, Application, School selection किंवा Form submission करताना चूक होऊ शकते. ही चूक दुरुस्त करण्याची पद्धती माहित नसल्याने गोंधळ होऊ शकतो. कारण एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही.

 दहावीचा निकाल इथे पहा 

RTE online Admission 2024 अशी करा दुरुस्ती

आरटीई ऑनलाइन भरलेला फॉर्म चुकला असेल तर खालील दोन पद्धतीने फॉर्म दुरुस्त करता येतो 

पद्धत 1 

  • जर आपण फायनल सबमीट केले नसाल तर खालील प्रक्रिया करावी.  
  • युजरनेम आणि पासवर्ड टाकून SIGN IN करावे.
  • SIGN IN केल्यानंतर खालील चित्रामध्ये दाखवल्या प्रमाणे LOGOUT च्या पुढे  DELETE  APPLICATION दिसेल त्यावर क्लिक करून पूर्ण अर्ज  डिलीट करावा.
  • पुन्हा नव्याने NEW REGISTRATION करावे आणि  अचूक माहिती भरावी.

RTE online  Form 2024
RTE online  Form 2024

पद्धत 1 

  • आपण जर फायनल सबमीट केले असाल तर खालील प्रक्रिया करावी.  
  • लॉगिन करून फॉर्म प्रिंट करावे. 
  • प्रिंट केलेल्या फॉर्म मध्ये कोणत्या बाबी चुकल्या आहेत ते पहावे. 
  • त्यास अनुसरून जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दुरुस्ती बाबत विनंती करावे. 
  • आपल्या अर्जसोबत फॉर्म ची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे द्यावे. आपणास फॉर्म दुरुस्ती किंवा डिलिट करून मिळेल.

लक्षात असुद्या - एकदा सबमिट केलेला  फॉर्म  आपल्या लॉगिन वरुण पुन्हा डिलीट करता येत नाही.  जर डिलिट करावयाचा असेल तर शिक्षणाधिकारी यांना विनंती अर्ज करून डिलिट / दुरुस्त  करता येतो. तसेच एका बालकाचा  अर्ज एका पेक्षा जास्त भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील.


म्हणून अचूक अर्ज भरावा. चुका झाल्यास गोंधळून जाऊ नये. वरीलप्रमाणे अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा. आणि पुन्हा नव्याने भरावा.



4 Comments

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now