Shahu College 11th Admission: नुकताच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये पुन्हा लातूर पॅटर्न राज्यामध्ये ठळकपणे दिसून आला आहे. दहावीनंतर 11वी सायन्स ऍडमिशनसाठी Shahu College Admission लिंक देण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. लिंक आणि संपुर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Shahu College Admission Link |
शाहू कॉलेज लातूर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी सुर; Shahu College Admission Link इथे पहा
राजर्षी शाहू महाविद्यालय (ज्युनिअर सायन्स) लातूरची वेगळी छाप देशभरात आहे. यशवंतांची खान म्हणून या लातूर पॅटर्नकडे पहिले जाते. अकरावी विज्ञान शाखेसाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी 1080 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये अनुदानित तुकडीवर 480 विद्यार्थी, विना अनुदानित तुकडीमध्ये 360 विद्यार्थी आणि सेल्फ फायनान्स तुकडीमध्ये 240 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
Shahu College Admission Link
शाहू कॉलेज अकरावी सायन्स साठी फक्त ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे. Registration Link खालीलप्रमाणे देण्यात आहे. https://junior-shahucollegelatur.org.in/ आहे.
महत्वाच्या तारखा
- प्रवेश नोंदणी शुल्क - 200/-
- प्रवेश नोंदणी - 28 मे ते 03 जून 2024
- फॉर्म दुरुस्ती - 04 ते 05 जून 2024
- पहिली निवड यादी - 08 जून 2024
- दुसरी निवड यादी - 14 जून 2024
- तिसरी निवड यादी - 18 जून 2024
अधिक माहितीसाठी सविस्तर वेळापत्रक पहा
- वेबसाईट वरील नोंदणी प्रक्रिया बाबतचे नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक तसेच माहितीपुस्तक वाचून घ्यावे.
- नोंदणी फॉर्म भरताना CASTE , CATEGORY , समांतर आरक्षण , 10th मार्क इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी.
- CATEGORY प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास सेतू मधील प्रस्ताव दाखल केल्याची पावती जोडावी.
- पहिली निवड यादी जाहीर झाल्यानंतर समांतर आरक्षण मधील दुरुस्ती कोणत्याही सबबी खाली स्वीकारली जाणार नाही.
- नोंदणी केलेल्या माहितीत गुणवाढ व्यतिरिक्त इतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही. याबाबत कोणीही अर्ज करू नये.
- अर्जामधील दुरुस्त्या या दिलेल्या नोंदणी कार्यक्रम वेळापत्रकाप्रमाणेच स्वीकारल्या जातील. या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तरी विद्यार्थ्यांनी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे.
- नोंदणी फीस भरल्याशिवाय CONFIRMATION PAGE प्रिंट करता येणार नाही.