UGC NET Exam Date 2024: नेट परीक्षा विषय निहाय तारखा जाहीर; परीक्षा पद्धतीतही मोठा बदल

 UGC NET Exam Date 2024 नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC-NET June  2024 परीक्षा OMR (पेन आणि पेपर) मोडमध्ये 18 जून 2024 रोजी देशातील विविध शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये घेतली. या परीक्षेला बसण्यासाठी 11लाख 21 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, 9 लाख 8 हजार विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. परंतु केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयच्या वतीने केवळ 24 तासाच्या आत  ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता UGC NET Exam Date 2024 या परीक्षेची विषय निहाय  तारीख जाहीर करण्यात आली आहे.  

UGC NET Exam Date 2024
UGC NET Exam Date 2024

UGC NET Exam Date 2024: नेट परीक्षा विषय निहाय तारखा जाहीर; परीक्षा पद्धतीतही मोठा बदल 

NTA म्हणजे National Testing Agency कडून दिनांक 02 ऑगस्ट 2024  रोजी  नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार  विषयांच्या परीक्षांच्या तारखा खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत. 

UGC NET Exam Date 2024

https://ugcnet.nta.ac.in/images/public-notice-for-schedule-of-ugc-net-june2024.pdf

परीक्षा पद्धतीतही मोठा बदल 

वरील विविध परीक्षा ह्या ऑफलाइन मोड (पेपर पेन्सिल/पेन) मध्ये घेण्यात आल्या होत्या. परंतु आता या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने संगणकाधारीत होणार आहेत असे परिपत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे. 

यूजीसी नेट परीक्षा तीन हेतुसाठी घेतली जाणार 

आपणास माहीत आहे यावेळी यूजीसी नेट परीक्षा ही खालील तीन करणासाठी घेतली जाणार आहे. 

  •  'ज्युनियर रिसर्च फेलोशिपचा (JRF) पुरस्कार आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती', 
  • 'सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएच.डी.साठी प्रवेश.' आणि
  • 'पीएच.डी.साठी प्रवेश
  • कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात अडचण आल्यास किंवा तपशिलांमध्ये तफावत असल्यास प्रवेशपत्रात समाविष्ट असलेले, UGC NET जून 2024 साठीचे उमेदवार, 011- 40759000 वर किंवा ugcnet@nta.ac.in वर ई-मेलवर संपर्क करू शकतात.
  • नवीनतम अपडेटसाठी उमेदवारांना NTA (www.nta.ac.in) आणि (https://ugcnet.nta.ac.in/) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावे 

Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now