केंद्रप्रमुख पदोन्नती : राज्यभरातील शिक्षक मुख्याध्यापकांसाठी महत्वाचे मार्गदर्शनप्र पत्र शासनाच्यावतीने जारी करण्यात आले आहे. नेहमी Kendrpramukh Pramotion देत असतांना जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यांची सेवा ज्येष्ठता ठरवितांना कोणता दिनांक विचारात घ्यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
Kendrpramukh Pramotion 2024 |
Kendrpramukh Pramotion 2024: केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीसाठी ही तारीख महत्वाची; शासनाचे मार्गदर्शन आले
Kendraprmukh Pramotion: याबाबत सविस्तर असे की मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या वतीने केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देत असतांना जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यांची सेवा ज्येष्ठता ठरवितांना कोणता दिनांक विचारात घ्यावा यासाठी 10 जुलै 2024 रोजी मार्गदर्शन मागविले होते.
Kendrpramukh Pramotion 2024
त्यानुषंगाने शासनाच्या वतीने केंद्रप्रमुख पदोन्नतीबाबत कळविले आहे की शासनाच्या विविध शासन निर्णयामधील तदतुदी विचारात घेवून आपण केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतेची कोणत्या पदाच्या नियुक्तीच्या दिनांकाबाबत या कार्यालयाकडे धारणा पक्की करणेबाबत कळविले आहे.
Kendrpramukh Pramotion 2024
त्यानुसार शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दि. 27 सप्टेंबर 2023 मध्ये नमूद केलेनुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीत नेमणूक करणेबाबत स्वयंस्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
सबब शासन निर्णयातील तरतूदीनुसार केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीने नेमणूक करतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर वेतोत्रती झाल्याच्या दिनांकापासूनची सेवा ज्येष्ठता विचारात घेऊन शासन निर्णय दि. 27 सप्टेंबर 2023 च्या तरतूदीनुसार केंद्रप्रमुख पदोन्नतीची कार्यवाही करणे योग्य ठरेल. तरी सदर प्रकरणी उपरोक्त प्रमाणे आपली धारणा पक्की करण्यात येत आहे. असे सांगितले आहे.
Kendrpramukh GR
त्यानुसार आता 27 सप्टेंबर 2023 रोजीचा शासन निर्णय महत्वाचे आहे. शासन निर्णय पहा