SET Exam Result Date: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरीष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरीता प्राधिकृत विभाग आहे.
SET Exam Result Date |
SET Exam Result Date : सेट परीक्षा निकालाबाबत मोठी अपडेट; यामुळे होतोय उशीर
दि. ७ एप्रिल, २०२४ रोजी ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता १७ शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सेट परीक्षा विभागाकडून पुर्णत्वास आले आहे.
SET Exam Result Date 2024
परंतू सदर सेट परीक्षेसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून याबाबत विद्यापीठाकडून राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. सबब, राज्यशासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच ७ एप्रिल, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल.