Vidyut Shayak Bharti 2024: महावितरण विद्युत सहायकची सुधारित जाहिरात प्रसिद्ध

Vidyut Shayak Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील "विद्युत सहाय्यकाची" पदे सरळसेवा भरतीद्वारे भरणेकरीता जाहिरात क्रमांक 06/2023 कंपनीच्या संकेतस्थळावर माहे डिसेंबर 2023 मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. तसेच उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरणेकरीता दि.20/06/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.


Vidyut Shayak Bharti 2024
Vidyut Shayak Bharti 2024

Vidyut Shayak Bharti 2024:  महावितरण विद्युत सहायकची सुधारित जाहिरात प्रसिद्ध  

दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम-2024 दि. 26 फेब्रुवारी, 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरीता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/१६-क, दि.२७.०२.२०२४ अनुसार प्रस्तुत संवर्गाच्या विज्ञापीत जाहिरातीकरीता लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण निश्चित करुन त्यानुसार पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाचा सुधारीत तपशील खालीलप्रमाणे राहील 

Vidyut Shayak Bharti 2024
Vidyut Shayak Bharti 2024


अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गातील प्रवर्गाचा विकल्प सादर करणे तसेच सदर उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे :-

  • शासन निर्णय दि. 27/02/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने, सदर मूळ जाहिरातीस अनुसरुन अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे.
  • सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग याचा दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल.

  • सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग याचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) चा लाभ अनुज्ञेय होणार नाही. ज्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी ई.डब्ल्यु.एस प्रवर्गामध्ये अर्ज भरले आहेत त्यांनी खुल्या अथवा एसईबीसी प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा उमेदवारांची विकल्प न भरता ई.डब्ल्यु.एस. प्रवर्गातून निवड झालेस त्यांची निवड रद्द करण्यात येईल, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • एसईबीसी उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे वयामध्ये शिथिलक्षमता देण्यात येत आहे. त्यामुळे खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज करु शकले नाहीत, अशा उमेदवारांनाही नव्याने अर्ज करणेकरीता संधी देण्यात येत आहे. त्याचबरोबर शासन निर्णय दि. 03/03/2023 नुसार त्यांना अधिक दोन वर्षांची वयामध्ये सूट देण्यात येत आहे.

  • एसईबीसी उमेदवारांबरोबरच इतर प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज सादर करु शकले नाहीत, त्यांनाही अर्ज करणेकरीता मुदतवाढ देण्यात येईल. उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याकरीता URL लिंक लवकरच कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. सबब, एसईबीसी उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडून प्राप्त करुन घेण्याची कार्यवाही करावी.
  • एसईबीसीचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्यासाठी विहित करण्यात येणाऱ्या अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमेदवारांकडे सन 2023-24  अथवा 2024-25 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (NCL) प्रमाणपत्र अर्ज सादर करताना आवश्यक राहील,
  • सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक 29 डिसेंबर, 2023 असा राहील.
  • एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता उच्चतम वयोमर्यादेमध्ये ५ वर्षे शिथिलता देण्यात येत आहे. मुळ जाहिरात क्र.06/2023  मधील मुद्दा क्र. ३ तसेच या पदाच्या भरती प्रक्रियेबाबत प्रसिध्द करण्यात आलेले शुध्दिपत्रक दि.17/05/2024  मधील वयोमर्यादेबाबतचे इतर मुद्दे अबाधीत राहतील.
  • सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे
  • रिट याचिका क्र. 3468/2024 दाखल करण्यात आली होती. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी
  • मा. उच्च न्यायालयाने दि.16/04/2024 रोजीचा आदेश व सदर न्यायालयीन प्रकरणाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सदर भरती प्रक्रिया करण्यात येईल.
  • उक्त पदाच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्चः अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • मूळ जाहिरात क्रमांक 06/2023मधील तसेच या जाहिरातीसंदर्भात यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या शुध्दिपत्रकामधील इतर अटी व शर्ती अपरावर्तीत रहातील.



Please do not entre any spam link in the comment box.

Post a Comment (0)
Previous Post Next Post
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now