Teacher Transfer GR: जिल्हा परिषद शिक्षक बदली बाबत आज दिनांक 18 जून 2024 रोजी 25 पानाचा नवीन जी आर काढण्यात आला आहे. Teacher Transfer GR विषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
Teacher Transfer GR |
Teacher Transfer GR: जिल्हा परिषद शिक्षक बदलीचे नवीन धोरण जाहीर; इथे पहा २५ पानाचा नवीन जी आर
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन दि.07 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे.
Teacher Transfer GR
दि.07 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयान्वये सन 2022 ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना/निवदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच शासन निर्णय दि. 07 एप्रिल 2021मधील काही तरतूदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. 677/ 2023 मध्ये दि. 13 जानेवारी 2023 रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि. 07 एप्रिल 2021 मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना/निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी 14 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला.
जिल्हा परिषद शिक्षक बदलीचे नवीन धोरण जाहीर
सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय डाउनलोड करा