Latur NHM Bharti 2024: जिल्हा परिषद लातूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुंटूंब कल्याण सोसायटी, लातूर आरोग्य विभागामध्ये जिल्हा निवड समिती कडून खालील विविध पदांची भरती केली जाणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून Latur NHM Bharti 2024 करिता ऑफलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
Latur NHM Bharti 2024 |
Latur NHM Bharti 2024: जिल्हा निवड समितीकडून विविध पदांची भरती जाहीर; अर्ज करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वा वित्त आयोग अंतर्गत खालील पदासाठी एकत्रित मासिक मानधनावर पदभरती करण्यात येणार आहे.
Latur NHM Bharti 2024 पदाचे नाव -
- स्टाफ नर्स (महिला)
- MPW (पुरुष
एकूण रिक्त पदे - 61
- स्टाफ नर्स (महिला)
- MPW (पुरुष
Latur NHM Bharti 2024 शैक्षणिक पात्रता -
- स्टाफ नर्स या पदासाठी उमेदवार GNM / B Sc नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला असावी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणी केली असणे आवश्यक आहे.
- MPW (पुरुष) या पदासाठी उमेदवार सायन्स विषयासह 12 वी उत्तीर्ण असावा. पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला आवा.
Latur NHM Bharti 2024 वयोमर्यादा
- स्टाफ नर्स पदासाठी कमाल वयोमर्यादा 65 वर्ष आहे.
- MPW या पदासाठी खुल्या संवर्गातील उमेदवार कमाल 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो तर राखीव प्रवर्गातील उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो.
वेतन -
- स्टाफ नर्स या पदासाठी दरमहा एकूण 20000/-
- MPW या पदासाठी दरमहा एकूण 18000/- वेतन दिले जाणार आहे.
Application fees for Latur NHM Bharti 2024
- खुल्या प्रवर्गासाठी 150/-
- राखीव प्रवर्गसाठी 100/-
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
- अर्जाचे शुल्क केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल.
- अर्जासोबत फीस भरल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
- अर्जाचे शुल्क खालील खातेवार IMPS किंवा NEFT करावे
- District Integrated Health & Family Welfare Society, Latur
- बैंक शाखा Bank Of Baroda, Latur, Account No.- 09900100046001,
- IFSC Code- BARBOLATURX (आयएफएससी कोड मधील पाचवे अक्षर शुन्य आहे) ऑनलाईन भरणा केल्याचा पुरावा अर्जासोबत जोडला नसल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही.
Latur NHM Bharti 2024 फॉर्म स्वीकृती दिनांक व ठिकाण
- पात्र आणि इच्छुक उमेदवाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर येथे दिनांक 05 जुलै 2024 रोजीपर्यंत खालील जाहिरात वाचून जोडलेला अर्ज पूर्ण भरावा आणि आवश्यक त्या सर्व कागदपत्रसह जमा करावा.
- अधिकृत वेबसाइट https://zplatur.gov.in/
- अधिक माहिती व अटी शर्ती नियम पाहण्यासाठी वरील मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी